पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | वाकड परिसरातील एका हॉटेलमध्ये नाचताना वादविवाद झाल्यानंतर हॉटेलच्या बाऊन्सर, मॅनेजरकडून मारहाण होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी एका तृतीयपंथीने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात ‘द बार हिस्ट’ या हॉटेलचे मॅनेजर, बाऊन्सर यांचेवर गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी हॉटेल मॅनेजर गजानन नामदेव खरात यांची 50 हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका करण्यात आली असल्याची माहिती अॅड. प्रसाद निकम यांनी दिली. ही घटना 25 जुलै रोजी घडली होती.
आरोपी गजानन खरात यांनी अॅड. निकम यांच्या मार्फत पुणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. खरात यांच्या वतीने युक्तीवाद करताना अँड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, फिर्यादीमध्ये मयत अभय मनोज गोंडाणे याने दारु पिल्याचा उल्लेख केला आहे. अभय गोंडाणे याची पार्टीमध्ये नाचताना दुसऱ्या एका तृतीयपंथीयासोबत वाद झाले होते. त्यामुळे हॉटेल स्टाफने त्यांना बाहेर काढले. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खरात हे हॉटेलची व्यवस्था पाहण्याचे काम करतात. कोणताही व्यक्ती गोंधळ घालत असेल तर त्याला बाहेर काढण्याचे काम त्यांचे आहे. मयत अभय हा गोंधळ घालत असल्याने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्याने आणखी दारुची मागणी करत खरात यांच्यासोबत वाद घातला. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला असल्याचे अॅड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपी खरात हे गुन्हा दाखल झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत असल्याचे न्यायालयाला सांगितले. अॅड. निकम यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने गजानन खरात यांचा जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. प्रसाद निकम, अॅड. तन्मय देव, अॅड. मन्सूर तांबोळी, अॅड. शुभम बोबडे यांनी काम पाहिले.
Web Title :- Pune Pimpri Crime | Bail granted to accused in transgender death case
हे देखील वाचा :
Manasi Naik Divorce | अखेर घटस्पोटाच्या चर्चांवर मानसीने सोडले मौन; म्हणाली – ‘हो मी घटस्फोट घेतेय’