पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | आईसोबत दुचकीवरुन शाळेत जात असताना एका चारचाकीची धडक दुचाकीला बसली. यामध्ये शाळकरी मुलगा मालवाहू ट्रकच्या खाली सापडला. या भीषण अपघातात मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. हा अपघात (Pune Pimpri Crime) आज (गुरुवार) सकाळी जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नरला झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अथर्व रवींद्र आळणे (वय-11) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. आज सकाळी हर्षदा आळणे या अथर्वला घेऊन दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. शाहूनगरच्या कॉर्नरला स्कुटीला चारचाकी वाहनाची धडक बसली. त्यामुळे स्कुटीवर असलेला अथर्व मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडला. तर हर्षदा दुसऱ्या बाजूला पडल्या. (Pune Pimpri Crime)
या अपघातात हर्षदा किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर अथर्वला ट्रकने काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून हर्षदा यांनी हंबरडा फोडला.
अथर्व असा अचानक आपल्याला सोडून जाईल याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती.
या अपघाताची नोंद भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक आणि चारचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Crime | an 11 year old school boy died in an accident in pimpri chichwad
हे देखील वाचा :
Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार
Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत