Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) विशेष मोहीम राबवून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत ही विशेष मोहिम राबवून तब्बल 253 घातक शस्त्रे जप्त करुन 211 गुन्हेगारांना अटक (Pune Pimpri Chinchwad Crime) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या विशेष मोहिमेत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Commissionerate) अंतर्गत असलेले सर्व पोलीस स्टेशन (Police Station), गुन्हे शाखा (Crime Branch) यांनी ही कारवाई केली. यामध्ये 36 गुन्हे हे केवळ विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळणाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर इतर गुन्हे तलवार, कोयता यासारखी घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी 150 गुन्हे दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 211 गुन्हेगारांना अटक (Arrest) करुन तब्बल 48 पिस्टल आणि 205 शस्त्र असे एकूण 253 शस्त्र जप्त केली आहेत.
विशेष मोहिमेंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि पोलिसांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कामगिरीनुसार
क्रमांक देण्यात आले. पहिल्या क्रमांक दरोडा विरोधी पथक, द्वितीय क्रमांक गुंडा विरोधी पथक,
तृतीय क्रमांक युनीट-4 यांना मिळाला. तर पोलीस स्टेशन स्तरावर महाळुंगे (Mahalunge Police Station),
शिरगाव (Shirgaon Police Station) आणि पिंपरी पोलीस ठाण्यांनी (Pimpri Police Station)
उत्कृष्ट कामगिरी केली.
विशेष मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
(CP Vinay Kumar Choubey) यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला.
ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused
हे देखील वाचा :
Latur Crime News | विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुर्दैवी मृत्यू; लातूरमधील घटना
Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा
Comments are closed.