Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांविरुद्ध FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सासरच्या छळास कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि.31 डिसेंबर 2023) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काजल सोनवणे (वय-25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आकाश सोनवणे, दोन महिला, प्रसाद सोनवणे (सर्व रा. खंडोबा माळ, फुरसुंगी मार्केटजवळ, पुणे) यांच्यावर आयपीसी 306, 498, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत काजय यांचे वडील प्रकाश जानु सावंत (वय-55 रा. उरुळी कांचन) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन काजल हिच्यासोबत किरकोळ कराणावरुन सतत वाद घातले. तसेच तिला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. सासच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला वैतागून काजल हिने रविवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी तिचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.
- इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना
- थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
- तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कधीही खाऊ नका हे 5 प्रकारचे पदार्थ, आजपासूनच त्यांच्यापासून राहा दूर…
- हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…
- गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त
- पुणे महानगरपालिकेतील सेवकाविरूध्द (शिपाई) 20 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल
Comments are closed.