Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: मजुराच्या गळ्यावर धारदार कटरने वार, दोघांवर गुन्हा; एकाला अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भंगार गोळा करण्याच्या कारणावरून दोघांनी एका मजूरावर धारदार कटरने गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील भाजी मंडई जवळील पुलाखाली घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
याबाबत महेश आंबादास करनाके (वय-38 रा. पिंपरी भाजी मंडई जवळ, मुळ रा. कार्ला चौक, जि. वर्धा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजु लालबहाद्दुर प्रसाद (वय-31 रा. पिंपरी भाजी मंडई, मुळ रा. गावखेडी, ता. खेरी) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार रवि सुर्यवंशी (वय-35 रा. पिंपरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 351(2)(3), 3(5), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी भाजी मंडईजवळ भंगार गोळा करत होते. भंगार गोळा करण्याच्या कारणावरुन आरोपींनी महेश यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर धारदार कटरने गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन पोलिसांनी राजू प्रसाद याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख करीत आहेत.
ज्येष्ठ नागरिकाला दमदाटी
गाडी चालवताना गाडी घासल्याच्या कारणावरुन एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन दमदाटी करत धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गुरुवारी भोसरी येथील गोडाऊन चौकातील सिग्नल जवळ घडला. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सदाशिव विष्णु क्षिरसागर (वय-71 रा. मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.