Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, 8 जणांना अटक

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | WhatsApp वर संपर्क साधून ऑनलाईन पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने (Lure Of Part Time Job) महिलेची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) 8 जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान रावेत येथील मुकाई चौकातील (Mukai Chowk Ravet) महिलेच्या घरात घडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.4) करण्यात आली.
याबाबत 26 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्ताफ मेहबूब शेख (वय-24 रा. पवार चाळ, जुनी सांगवी), मनोज शिवाजी गायकवाड (वय-23 रा. दापोडी), अनिकेत भाऊराव गायकवाड (वय-22 रा. नवी सांगवी), पवन विश्वास पाटील (वय-22 रा. संततुकाराम नगर, पिंपरी), चैतन्य संतोष आबनावे (वय-21 रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), सौरभ रमेश विश्वकर्मा (वय-23 रा. पिंपळे गुरव), कृष्णा भगवान खेडकर (वय-27 रा. मु.पो. घाटशीळ पारगाव ता. शिरुर जि. बीड), हाफिज अली अहमद शेख (रा दापोडी) यांच्यावर आयपीसी 406, 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ऑनलाइन संपर्क साधला. फिर्यादी यांना ऑनलाइन पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून लिंक पाठवली. फिर्यादी यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये घेऊन त्यांना टास्क खरेदी करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर 33 हजार रुपये पाठवून टास्कमध्ये गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी टास्कचे पैसे व परतावा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आठ जणांना अटक केली. पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे करीत आहेत.
Comments are closed.