Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला, 5 जणांना अटक

July 10, 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगडाने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.8) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथे घडला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attack On Youth)

प्रेम कृष्णा तिपाले (वय-19 रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने मंगळवारी (दि.9) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण अनिल शिंदे (वय-23), रोहित अनिल शिंदे (वय-24), नितीन विलास जाधव (वय-20 तिघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), युवराज शिवाजी शिंदे (वय-43), विकी महादेव देवकुळे (वय-27 दोघे रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्यावर 115(2), 118(2), 125(ब), 189(4), 190, 191(3) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी प्रेम तिपाले यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रेम त्याचे चिकन सेंटर बंद करुन मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी जुन्या वादाच्या रागातून प्रेम याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर हाताने मारहाण केली. तिथून पळून जात असताना आरोपींनी दगड फेकून मारले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.