Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईलचे पैसे मागितल्याने तरुणाचा खून; तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंद (Video)

October 12, 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल विकत घेतला त्याचे पैसे देऊन टाक असे सांगितल्याच्या रागातून तिघा गुंडांनी चाकूने वार करुन तरुणाचा खून केला (Murder Case). त्यानंतर हे गुंड पळून गेले. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पकडले.

सत्यजित शंकर कांबळे (वय २३, रा. महादेवनगर, भोसरी), निखिल राजीव कांबळे (वय २१, रा. महादेवनगर, भोसरी, दोघेही मुळ रा. सावळेश्वरे ता. कंधार , जि. नांदेड), रमेश नामदेव कांबळे, देवानंद ऊर्फ गौरव रमेश कांबळे, मानव महेंद्र कांबळे (वय २१, सर्व रा. महादेवनगर, भोसरी, मुळ रा. हडको, सिद्धेश्वर मंदिराजवळ, ता. जि. नांदेड) अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत आकाश परदेशी (वय २८, रा. महादेवनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक साबे याचा मोबाईल रमेश कांबळे याने १२ हजार रुपयांना विकत घेतला होता. त्यापैकी फक्त ५०० रुपये त्याने दिले होते. कार्तिक साबे याने रमेशकडे पैसे मागितले. तेव्हा आकाश परदेशी याने कार्तिक लहान आहे, त्याचे पैसे देऊन टाक. तेव्हा रमेश कांबळे याने जा नाही देत पैस काय करायचे ते कर, असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर रमेश कांबळे साथीदारांना घेऊन आला. त्याने आकाश परदेशी याच्या पाठीत चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याला वाय सी एम रुग्णालयात नेले असता डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या नंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तीन तपास पथके तयार केली. त्यांचा शोध घेण्यासाठी दिघी, कार्ला, लोणावळा, मुंबई, नांदेड येथे आरोपींचा शोध घेतला. नातेवाईक तसेच मित्रांकडे सखोल तपास केला. तेव्हा गोपनीय माहिती मिळाली केली़ काही आरोपी संभाजीनगर येथे आहेत. त्यानुसार पोलिसांनी सलग तीन दिवस आरोपींचा माग करुन संभाजीनगर येथे १० ऑक्टोबर रोजी सत्यजित कांबळे आणि निखिल कांबळे यांना अटक केली. नांदेड येथे गेलेल्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हवालदार भोसुरे, नांगरे, जैनक, मेरगळ यांनी नांदेड येथे सलग चार दिवस मुक्काम करुन आरोपींचा माग काढला. आरोपींचा नांदेड ते किनवट असा पाठलाग केला. रमेश कांबळे, देवानंद ऊर्फ गौरव कांबळे आणि मानव कांबळे यांना किनवट मार्गे तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारी असताना महाराष्ट्र सीमेनजीक बोदडी गावाचे जंगलातून पकडले.
आरोपींबाबत काही एक सुगावा नसताना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने समांतर तपास करुन व माहिती काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा कौशल्यपूर्ण वापर करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, संदिप सोनवणे, प्रदिप राळे, मनोज साबळे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सूर्यवंशी, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.