Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात पोलिसांकडून 33 घुसखोर बांगलादेशींना बेड्या

January 7, 2025

पिंपरी- चिंचवड: Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांमधून विविध धर्माची आणि जातीची लोक शहरात वसलेली आहेत. अशातच शहरात घुसखोर बांगलादेशींचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी- चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या परिसरात बांगलादेशींना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले आहेत. भोसरीमध्ये वर्षभरात १२ बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हे सर्व बांगलादेशी बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहात होते. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅनकार्ड यासह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान बांगलादेशींना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे.