Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणीला दिला मानसिक त्रास ! तिने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने त्याने तरुणीला मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली.
पायल मच्छिंद्र कोकाटे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (वय ४८, रा. बोतार्डे, ता. जुन्नर)यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राम कोकाणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशीमधील आदर्शनगर (Adarsh Nagar Moshi) येथे ३१ जुलै रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही शिक्षणासाठी मोशीतील आदर्शनगर येथे रुम घेऊन रहात होती. तिने राम कोकणे याला उसने पैसे दिले होते. ते पैसे पायल त्याला परत मागत होती. पैसे देण्यास तो टाळाटाळ करुन तिला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खताळ अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.