Pune Crime News | पुराव्या अभावी खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पब्जी गेम खेळत असलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून (Murder) केल्याची घटना 31 डिसेंबर 2022 राजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात (Pune Crime News) अटक करण्यात आलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे (District and Sessions Court) न्यायाधीश एच बी शिरसाळकर (Judge H.B. shirsalkar) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील मिथुन एस. चव्हाण (Adv. Mithun S. Chavan) यांनी दिली.
रोहीत दरेकर (Rohit Darekar) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 302, 307, 504, 506, 109, 34 तसेच आर्म अॅक्ट नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन आयाण नासीर शेख (Ayan Nasir Shaikh) याला अटक केली होती. ही घटना (Pune Crime News) कसबा पेठेतील अगरवाल सोसायटीच्या गेट जवळ घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर अडीच महिन्यात न्यायालयाने त्याचा पुराव्या अभावी जामीन मंजूर केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेच्या दिवशी काही मुले पब्जी गेम (PUBG) खेळत असताना अज्ञात मुलांनी रोहीत दरेकर याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित दरेकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आयाण शेख याला अटक (Arrest) केली होती.
आरोपी आयाण शेख याने अॅड. मिथून चव्हाण यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अॅड. चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या घटनेत पाच ते सहा आरोपी आहेत. मात्र आरोपी आयाण शेख याच्या बाजूने कोणतेही पुरावे नाहीत,
त्यामुळे आयाण शेख याला जामीन मिळावा असा युक्तीवाद अॅड. चव्हाण यांनी केला. अॅड. चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. मिथून चव्हाण यांना अॅड. प्रशांत सी. पवार (Adv. Prashant C. Pawar) यांनी सहकार्य केलं.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 3 bookies arrested in Talegaon Dabhade for betting on IPL cricket matches
हे देखील वाचा :
Comments are closed.