Pune Pimpri Chinchwad Crime | खोटी कागदपत्र देऊन बँकेची 40 लाखाची फसवणूक, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | घरावर बँकेचे कर्ज (Home Loan) असताना खोटी कागदपत्रे तयार करुन कर्ज नसल्याचे दाखवून बँकेकडून 40 लाख रुपये कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार वाकड परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) डिसेंबर 2014 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत लाला अर्बन को. ऑप. बँक लि. नारायणगाव, शाखा काळेवाडी (Lala Urban Co. Op. Bank Ltd. Narayangaon, Branch Kalewadi) येथे घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत बँकेचे शाखाधिकारी महेंद्र बाबुराव आवटे Mahendra Baburao Awte (वय-42 रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश सुभाष गाते Mahesh Subhash Gate (वय-39 रा. विनोदे वस्ती, वाकड) याच्यावर आयपीसी 165, 468, 471, 406, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश गाते यांनी त्यांच्या विनोदी वस्ती येथील सिद्धी निसर्ग सोसायटीमधील फ्लॅटवर अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) कर्ज घेतले. त्यानंतर फ्लॅटची खोटी कागदपत्र तयार करुन लाला अर्बन बँकेत कर्ज मंजुरीसाठी दिली. बँकेने गाते यांना 40 लाख रुपये कर्ज मंजूर करुन कर्जाची रक्कम दिली. कर्ज घेतल्यानंतर महेश गाते यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे लाला अर्बन बँकेकडून गाते यांच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्या फ्लॅटवर पूर्वीच अॅक्सिस बँकेने ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपी महेश गाते याने खोटी कागदपत्र देऊन बँकेची 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | Bank fraud of 40 lakhs by giving false documents, incident in Wakad area
हे देखील वाचा :
Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन, जुगार व दारु विक्री अड्यांवर कारवाई
Comments are closed.