Pune Pimpri Chinchwad Crime | टेलिग्रामद्वारे मेसेज करुन इंजिनीयर महिलेची 20 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील घटना
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | ऑनलाइन काम (Online Work) करुन दिवसाला 5 ते 8 हजार रुपये मिळतील, असे सांगून एका इंजिनियर (Engineer) महिलेला 20 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महिलेला टेलिग्रामद्वारे (Telegram) मेसेज करुन वेगवेगळे टास्क देऊन 20 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 8 फेब्रुवारी 2023 रात्री साडेदहा ते 11 फेब्रुवारी सकाळी साडेअकरा या वेळेत हिंजवडी येथे महिलेच्या राहत्या घरात घडला आहे.
याबाबत आयटी इंजिनियर असलेल्या 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिलांसह सहा खातेधारकांवर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) आहेत. त्यांना आरोपी महिलेने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून झेल्थ डिजिटल एजन्सी (Zelth Digital Agency), इंडिया ग्लोबल मीडियात (India Global Media) तुमच्यासाठी चांगल्या ऑफर असून तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात का, असे विचारले. (Pune Pimpri Chinchwad Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच त्यासाठी प्रत्येक दिवसाला 5 ते 8 हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले.
त्यानंतर टेलिग्रामद्वारे मेसेज करुन फिर्यादी यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले.
तसेच आरोपींच्या वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले.
फिर्य़ादी यांनी आरोपींनी सांगितल्या प्रमाणे वेगवेगळ्या खात्या 20 लाख 15 हजार रुपये पाठवले.
यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकराचा परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | 20 lakh fraud of an engineer woman by sending a message through Telegram, an incident in Hinjewadi area
हे देखील वाचा :
Nagpur Crime News | उद्याच्या पेपरचा अभ्यास न झाल्याने तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल
Pune Pimpri Chinchwad Crime | खोटी कागदपत्र देऊन बँकेची 40 लाखाची फसवणूक, वाकड परिसरातील घटना
Comments are closed.