पुणे न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Pune News Yerawada Jail | महाराष्ट्र कारागृह विभागा(Maharashtra Prisons Department)ची मुख्यालयाची नवीन सुसज्ज अशी इमारत येरवडा येथील जागेत बांधली जाणार आहे याबाबतची इमारत बांधण्याची कारवाई लवकर केली जाईल अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी दिली आहे. तसेच, कारागृहाच्या इतर अडचणीही दूर केल्या जातील असे सांगण्यात आले आहे. Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail – Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत कारागृह विभागाचा आढावा घेतला आहे.
यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागाच्या सन 2019-20 सांख्यिकी पुस्तकीचे विमोचन करण्यात आले आहे.
यावेळी गृह विभागाचे अपर मुख्यसचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र सुनिल रामानंद (additional director general of police sunil ramanand), कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई (Deputy Inspector General of Police Yogesh Desai), येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यु. टी. पवार (Superintendent of Police U. T. Pawar) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांना महाराष्ट्रातील कारागृहानी मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंद्याना न्यायालयात उपस्थित केले असल्याचे सांगितले.
तर कोरोना काळात कारागृह प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
तर याबद्दल गेल्या महिन्यातच न्यायालयाने या कामामुळे कारागृह प्रशासनाची प्रशंसा केली असल्याची माहिती ही यावेळी त्यांना दिली. गृहमंत्री वळसे पाटील यांनी कारागृह विभागात अभिनंदन केले.
–
यावेळी वळसे पाटील यांनी कोविडमुळे मृत्यू झालेल्या 8 कारागृह अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 50 लक्ष आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली असल्याचे सांगितले. तसेच, महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय सध्या जुन्या मध्यवर्ती इमारतीत आहे.
हे मुख्यालय लवकरच येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
तसेच सध्या पुरुष बंद्यासाठी असलेले खुली कारागृह (वसाहत)त्याप्रमाणे महिलांसाठी देखील सुद्धा खुली वसाहत निर्माण करण्यात येईल, असे सांगितले आहे.
Web Title : Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail – Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)
CM Uddhav Thackeray | ‘महिलांनो, तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा’ !
Why Aamir Khan Divorced Kiran Rao | आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? जाणून घ्या कारण