पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव टँकरने जेष्ठ दाम्पत्याच्या दुचाकीला Two Wheeler धडक दिल्याने झालेल्या अपघातात Accident महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर Pune Bangalore Highway नऱ्हे येथे ही घटना घडली आहे.
बबिता लुंबाराम सुतार (वय 53) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. तर लुंबाराम सुतार (वय 58) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी Sinhagad Road Police गोविंद सिंग (वय 43, रा. उत्तरप्रदेश) याला अटक Arrested केली आहे. याबाबत लुंबाराम सुतार यांचा मुलगा अर्जुन यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार कुटुंब आंबेगाव येथील दळवीनगर येथे राहतात.
ते पत्नी बबिता याना घेऊन घरी जात होते.
नवले ब्रिजकडून Navale Bridge साताऱ्याकडे जात असताना नर्हे येथील श्री कटील हॉटेलसमोर पाठीमागील भरधाव कंटेरने जोरात धडक दिली.
यात दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले.
यात बबिता यांचा मृत्यू झाला आहे.
अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
ACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड
‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी
Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार