पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 2 (Electric Crematorium Yerwada) दुरुस्तीच्या कामासाठी 11 दिवस बंद (Closed) राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) कार्यकारी अभियंता (विद्युत) योगेश माळी (Executive Engineer (Electrical) Yogesh Mali) यांनी पत्रकाद्वारे (Pune News) कळवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे महापालिकेच्या वतीने येरवडा येथे विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. या विद्युत दाहिनीतील विटा खराब झाल्याने आणि कॉईल नादुरुस्त झाली आहे. यामुळे विद्युत वाहिनीची कामं हाती घेण्यात आली असल्याने मंगळवार (दि.2) ते शुक्रवार (दि.12) या कालावधीत विद्युत दाहिनी बंद (Pune News) ठेवण्यात येणार आहे.
दरम्यानच्या काळामध्ये नागरिकांच्या सोईसाठी येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 1 व APC
सिस्टीमची सुविधा सुरु राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
Jio चा स्वस्त प्लान ! केवळ 399 रुपयात फ्री मिळेल Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar
Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई