पुणे (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – Pune News । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यावरून सर्वानी सामाजिक अंतर पाळणे असं सक्त नियम लागू केले आहेत. मात्र सोलापूर रस्त्यावर (Solapur Road) एक विचित्र प्रकार बघायला मिळाला. बुधवारी सोलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर एकूण 6 जण तसेच त्या दुचाकीवरील चौघे विनामास्क होते. या दुचाकीवर (Two-wheeler) दुचाकीचालक त्याची पत्नी, 2 मुले टाकीवर, 1 दोघांच्या मधे, तर 1 त्या महिलेच्या काखेतील झोळीमध्ये असे एकूण 6 जण रस्त्यावरून जात होते. या सहा जणांना बघून पोलीस (Police) देखील चकीत झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोलापूर रस्त्यावरून हे सहाजण दुचाकीवरून जात असताना तेथील रेसकोर्स पोलीस चौकीजवळ (Racecourse Police Station) पोलिसांनी हात केल्यानंतर दुचाकीचालकाने वाहन थांबवले. पोलिसांनी त्यांच्याकडे बघताच पोलिसच चक्रावले, त्यावेळी समजदार चिमुकल्याने शर्ट ओढून तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना देखील दया आली. त्यावेळी पोलीस म्हणाले, ‘तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा. धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका, आम्हाला कारवाई करण्यात समाधान वाटत नाही. परंतु, तुमच्या अशा बेफिकीरीपणामुळे कारवाई करावी लागते. तुमच्या चुकीची शिक्षा लहानग्यांना देऊ नका, असा देखील सल्ला त्यावेळी पोलिसांनी त्या दुचाकीचालकाला दिला आहे.
या दरम्यान, कोरोनाच्या कडक निर्बंधांमधून काही प्रमाणात वेळेनुसार सर्व आस्थापना सुरु झाल्या आहेत. तसेच लोकांची गर्दी देखील तितकीच होताना दिसत आहे. यातच बेफिकिरीने दुचाकीवर दोन ऐवजी पाच ते सहा जण जाताना दिसले. आपल्या जीवाशी खेळ करतात का असा देखील सवाल उपस्थित होतो.
Web Title : pune news two wheeler pune police six members solapur road pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन
Parambir Singh | …म्हणून परमबीर सिंग यांनी ‘सिक लिव्ह’ वाढवली