पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | आळंदी येथील (Alandi) संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 20 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोघा महिला वारकर्यांचा मृत्यु झाला आहे. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खालापूर (Khalapur) येथील माऊली कृपा चरिटेबल ट्रस्टच्या वतीने खालापूर ते आळंदी (Khalapur to Alandi) असा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखीमध्ये सुमारे 200 वारकरी सहभागी झाले आहेत. हे वारकरी मुंबई-पुणे महामार्गाने पायी येत होते. पायी पालखी साते फाटा येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आली होती.
एक टेम्पो मुंबईहून पुण्याकडे (Mumbai to Pune) येत होता. हा टेम्पो रस्त्याच्या कडेने जाणार्या वारकर्यांच्या समुहामध्ये घुसला. त्यात 20 वारकारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमी वारकर्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये 14 वारकर्यांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. अपघातात जखमी झालेले वारकरी हे प्रामुख्याने 60 ते 70 वयोगटातील असून त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Web Title :- Pune News | two killed 20 injured road mishap varkari dindi alandi mumbai to pune
Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी