पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. (Pune News)
पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.
Web Title :- Pune News | Traffic coming from Satara to Pune through new Katraj Tunnel via Daripool
हे देखील वाचा :
Nagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन
Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर
Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग