पुणे :बहुजननामा ऑनलाइन- Pune News | मुलाला शाळेत अॅडिमिशन (Admission) मिळाले नाही, म्हणून गृहविभागाला मंत्रालयात (Ministry of Home Affairs) बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा धमकीचा ई मेल (E-mail) करणार्यास पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. शैलेश शिंदे (रा. घोरपडी) याला मुंढवा पोलिसां (Mundwa Police) नी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसां (mumbai police) च्या हवाली केले आहे. Ministry of Home Affairs | One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune’s Ghorpadi area and will be handed over to Mumbai police.
मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल सोमवारी सायंकाळी गृह मंत्रालयाला मिळाला. त्यांनी सायंकाळी ६ वाजता याची माहिती मंत्रालयातील सुरक्षा विभागा ( Security Department) ला दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी तातडीने बॉम्बनाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले. त्यांनी सर्व परिसर पिंजून काढला. दरम्यान, दुसरीकडे हा ई मेल कोणाकडून आला याचा शोध सुरु झाला. तो पुण्यातील शैलेश शिंदे याने केल्याची माहिती मिळाली.
Maharashtra | One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune's Ghorpadi area and will be handed over to Mumbai police. Case registered at Mumbai's Marine Drive Police Station: Mumbai Police pic.twitter.com/RCnGv63JXc
— ANI (@ANI) June 21, 2021
मुंबई पोलिसांनी तातडीने ही माहिती पुणे पोलिसांना दिली. मुंढवा पोलिसांनी घोरपडी येथून शैलेश याला लगेजच ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही, या रागातून त्याने ई मेल केल्याचे सांगितले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शैलेश शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
गेल्या महिन्यात ३० मे रोजीही मंत्रालयात फोन करुन एकाने बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. त्यावरुन नागपूरमधील सागर मंदेरे याला तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. तो मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
web title: Pune News | The person who sent the e-mail that the bomb was kept in the ministry was taken into custody from Pune
शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार
Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा
Pune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न