• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी – डॉ. कल्याण गंगवाल

by sajda
January 13, 2021
in पुणे
0
Pune

Pune

बहुजननामा ऑनलाइन टीम – मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. काल-परवा मांजाने गळा कापल्याच्या घटना ताज्या आहेत. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे. ”
“या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १८ वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या सात वर्षात जवळपास २०० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, डॉ. गंगवाल (९८२३०१७३४३) यांच्याकडे जखमी पक्ष्यांबाबत माहिती द्यावी. या मोहिमेत अहिंसाप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.
—————–
यंदा पक्ष्यांवर संक्रात ओढवली
कोरोनापाठोपाठ राज्यातही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग पसरत असून, लाखो पक्ष्यांचे जीव जात आहेत. परभणी, बीडसह अन्य जिल्ह्यात कोंबड्या, कावळे व इतर पक्षी मरण पावत आहेत. वेळीच यावर उपाययोजना करून या निष्पाप जीवांचे रक्षण करायला हवे. पक्ष्यांवर ओढवलेली यंदाची संक्रात दूर करण्यासाठी सर्वानी या पक्षी बचाव मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Tags: Chinese catDr. Kalyan Gangwalpuneचीनी मांजाडॉ. कल्याण गंगवाल
Previous Post

अत्यंत दुर्मिळ अवस्थेतून जात आहे ‘ही’ मुलगी, छातीच्या बाहेर धडधडत आहे हृदय

Next Post

Bird Flu : ‘बर्ड फ्लू’मुळे MS धोनीचा ‘कडकनाथ’ फार्म धोक्यात

Next Post
MS Dhoni's Kadaknath

Bird Flu : 'बर्ड फ्लू'मुळे MS धोनीचा 'कडकनाथ' फार्म धोक्यात

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

लहान मुलांपासून अगदी प्रौढ अन् ज्येष्ठांना प्रदुषणाचा धोका, एक्सपर्टकडून जाणून घ्या रिस्क आणि उपचार

6 days ago

कुणाल पांड्याकडून अतीत शेठने हिसकावली लाइमाईट ! 16 चेंडूत बनवले अर्धशतक, मारले 7 षटकार

2 days ago

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

3 days ago

आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

1 day ago

Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खासगी खटला दाखल, केली ‘ही’ मागणी

3 days ago

Pune News : अबब ! लाचखोरी प्रकरणातील अटक महिला आणि न्यायाधीशांत तब्बल 147 वेळा ‘फोनाफोनी’; महिला न्यायाधीशांचा अटकपूर्व जामिन फेटाळला, खटला रद्द करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat