बहुजननामा ऑनलाइन टीम – शाळेत असल्यापासूनचे वाद आता विपोकला गेले असून, 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय तरुणावर हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. येरवडा परिसरात भरदुपारी हा राडा झाला( Gang attack on youth) आहे. टोळक्याने त्या तरुणाचा पाठलाग करून मारहाण तर केलीच पण मोठं मोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजवली. यामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित राजेंद्र वाघमारे (वय 21) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादनुसार टोळक्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी इस्माईल मैनुद्दीन शेरेकर (वय 18) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी शाळकरी मित्र आहेत. शाळेत असल्यापासून त्यांच्यात भांडण होत होते. याच भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. या रागातूनच 26 जानेवारी फिर्यादी तरुण हा
येरवड्यातील भाजी मार्केट चित्रा चौक परिसरात उभा असताना टोळक्याने त्याच्यावर हत्याराने वार करत जीवे घेणा हल्ला केला. यावेळी तरुणाने डोक्यावर वार केला. पण त्याने तो चुकवला आणि तेथून पळून गेला. त्यानंतर इतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत आरडाओरडा आणि शिवीगाळ केली आणि या परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच इस्माईल मैनुद्दीन शेरेकर याला अटक केली आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.