पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune News । पुण्यात (Pune) एका इमारतीमधील खिडकीच्या ग्रीलमध्ये (Grill) अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. पुणे अग्निशमन दलाच्या (Fire brigade) बचाव कार्याने (Rescue) या मुलीची सुटका केलीय याचा एक व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. पुण्यातल्या शुक्रवार पेठ येथील गणेश अपार्टमेंटमध्ये एक 15 वर्षीय मुलगी केस सुकवत होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याक्षणी तिचा पाय घसरला आणि ती पाचव्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये (Window grill) जाऊन अडकली. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. 2 तासाच्या कालावधीनंतर जवानांच्या प्रयत्नाने अखेर यश आलं. (pune news | safe release of girl trapped in window grill in pune thrilling video of rescue operation by fire brigade)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी त्या खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करुन, तिचा जीव वाचवला आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी आणि रशीच्या साहाय्याने या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. यामुळे त्या मुलीचा प्राण वाचला आहे.
या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर (Sachin Mandavkar),
तांडेल कैलास पायगुडे (Tandel Kailas Paygu), वाहनचालक राजू शेलार (Raju Shelar),
जवान राहूल नलावडे (Rahul Nalawade), अतुल खोपडे (Atul Khopade),
मारुती देवकूळे (Maruti Devkule), किशोर बने (Kishor Bane), संजय पाटील
(Sanjay Patil), अक्षय गांगड (Akshay Gangad), विठ्ठल शिंदे (Vitthal Shinde) यांचा सहभाग होता.
Web Title : pune news | safe release of girl trapped in window grill in pune thrilling video of rescue operation by fire brigade
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण
MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’