पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीतील (Success Square Society, Kothrud) भोंडल्याला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोसायटीतील पन्नासहून अधिक महिला यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. नवरात्रीत चौथ्या माळेला देवीला केशरी रंगाची साडी नेसविली जाते. त्यामुळे भोंडल्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांनीही केशरी रंगाच्या साड्या परिधान केल्याने सभागृहातील वातावरण भगवे (Pune News) झाले होते.
एक लिंबू झेलू बाई… दोन लिंबे झेलू, ऐलमा पैलमा गणेशदेवा… अक्कण माती…चिक्कन माती… कारल्याचे वेल….श्रीकांता कमलाकांता… कृष्णा घालितो लोळण… हरीच्या नैवेद्याला…अशी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत महिलांनी फेर धरला. उत्स्फूर्त सहभागाने सोसायटीचे भलेमोठे सभागृहही अपुरे वाटू लागले. भोंडल्यात भाग घेणाऱ्या बऱ्याच सुवासिनी नव्या डिजिटल युगाच्या प्रतिनिधी असल्या तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. भोंडल्यानंतर गरबा नृत्य सुरु झाले. गरबा नृत्यातही अबाल वृद्ध सर्वांच उत्साहाने सहभागी झाले.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
भोंडला हा प्रामुख्याने महिलांचा कार्यक्रम. पण सोसायटीच्या भोंडल्यात संयोजक महिलांनी पुरुष वर्गालाही आमंत्रण देऊन सहभागी करून घेतले. त्यामुळे सोसायटीच्या भोंडल्याला कौटुंबिक सोहळ्याचे स्वरुप प्राप्त (Pune News) झाले होते.
मृणाल नलावडे, ऋतुजा नलावडे आणि तपस्या भास्कर यांनी हत्तीच्या चित्राभोवती सुरेख रांगोळी रेखाटली. सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोरही रांगोळ्या रेखाटून आमंत्रितांचे स्वागत करण्यात आले.
खिरापत म्हणून इडली सांबर, डोसा आणि उपवासाच्या पदार्थ ठेवण्यात आले. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. मेधा काजळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना महेश भास्कर, अभिषेक काजळे, नागेश नलावडे व प्रदीप काजळे आदींनी सहकार्य (Pune News) केले.
Web Title : Pune News | Rangala Bhondla’s event at Success Square Society
BJP MLA Madhuri Misal | तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच – आमदार माधुरी मिसाळ
Milind Soman | शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?
Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी