बहुजननामा ऑनलाइन टीम – किरकोळ कारणावरून झालेल्या भाडणातून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. ही घटना पुण्यातील कोथरुड येथे घडली होती. (court grants bail )याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश व्ही. आर. जगदाळे कोर्टाने आरोपीचा सशर्त जामीन मंजूर केला.
अलंकार पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक विजय दुडे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 323, सह 34, शस्त्र अधिनियम, 1959 कलम 3, 4(25), मुंबई पोलीस अधिनियम, 1951 कलम 37 (1) (अ), 135 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीनुसार आरोपीने फिर्यादी यांना किरकोळ कारणावरून कोयता, लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात आरोपीने अॅड. राहुल नायर यांच्यामार्फत जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होत. फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रतीक विजय दुडे याने लोखंडी रॉडने मारहाण केली असा आरोप करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांनी फिर्यादी यांच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये लोखंडी रॉडने कुठेही जखम किंवा इजा झाल्याचे दिसून येत नाही. तसेच आरोपी यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे असा युक्तिवाद अॅड. राहुल नायर यांनी केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश व्ही. आर. जगदाळे कोर्टाने आरोपीला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.