पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | दक्षिणेत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडला असताना आता उत्तरपूर्वेकडील वार्यांचा जोर वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. या हंगामात प्रथम पुण्यातील (Pune News) तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली गेला आहे. अचानक तापमानात घट (Winter) झाल्याने सकाळी फिरायला जाणार्यांनी स्वेटर, मफलर, हातमोजे बाहेर काढलेले दिसून येत होते.
पुणे शहरात (Pune News) बुधवारी किमान तापमान ११.८ अशं सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट झाली. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि हवेली येथे ९.७ अंश सेल्सिअस आणि एनडीए हे आज सकाळी ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी पाषाण येथे १०.२, शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हंगामात प्रथम पुणे जिल्ह्यात (Pune News) सिंगल डिजिट किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या हंगामातील आतापर्यंतचे हे निच्चांकी किमान तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी शिवाजीनगर येथे १२ नोव्हेबर २०२० रोजी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
२७ नोव्हेबर २०१६ रोजी ९.३
१७ नोव्हेबर २०१४ रोजी ९.९
१९ नोव्हेबर २०१३ रोजी ७.९
तसेच २७ नोव्हेबर १९६४ रोजी पुण्यातील नोव्हेबर महिन्यातील सर्वात निच्चांकी ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद यापूर्वी झाली आहे.
web title : pune news pune recorded the lowest temperature of the season single digit minimum temp.