पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेची रॅली काढून दहशत पसरवणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) अटक केली. सिद्धार्थ संजय पलंगे (वय 21) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सहकारनगर दत्तवाडी आणि बंडगार्डन पोलीस (Bundgarden Police Station) ठाण्यांमध्ये (Bundgardan Police Station) ही जबर दुखापत आणि मारामारीचे किती गुन्हे दाखल आहेत. pune crime branch police arrest criminal
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा बिबवेवाडी भागात टोळक्याने धारधार हत्याराने निर्घृण खून केला होता. या खुणानंतर त्याच्या समर्थक व चाहत्यांनी सहकारनगर परिसरातून अंत्ययात्रा काढली होती. या अंत्ययात्रेदरम्यान शंभरहून अधिक दुचाकीवरून रॅली काढली गेली होती. रॅली काढण्यास सिद्धार्थ पलंगे आघाडीवर होता. याबाबत गुन्हा (FIR) दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अमलदार अमोल पवार यांना आरोपी सिद्धार्थ पलंगे हा खेड शिवापुर दर्गा जवळ मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून त्याला अटक केली.
पुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, इमरान शेख, तुषार माळवदकर, आय्याज दद्दीकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली आहे.
Web Title :- Pune News pune crime branch police arrest criminal
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच
कोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ! ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता