• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, पुणे
0
arrest

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन – शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयेची फसवणूक करणाऱ्या गोपनीय बातमीदार भामट्याला पुणे दहशतवादी पथक पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांनी दिली आहे.

याबाबत सिकंदर परमेश्वर राम (रा. मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याचे तीन साथीदार माञ फरार झाले आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रांजणगाव (ता. शिरूर) येथे फॅक्टरी सदृश पत्र्याच्या एका गोडावूनमध्ये 100 कोटी रुपयांच्या बनावट नोटा असून, सदर नोटा सिकंदर राम (रा. मुंबई) याचे मार्फत मिळू शकतात. परंतु, सिकंदर राम हा त्यासाठी एक लाख रक्कमेची मागणी करीत असून, तो मला कळंबोली (नवी मुंबई) येथे भेटण्यास येणार आहे. याबाबत संबंधित माहिती वरिष्ठांना कळवून त्यानुसार तात्काळ पोलिस पथक तयार केले होते.

सोमवारी (ता. 22) पहाटे तीनच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पुलाजवळ एक लाल रांगाची आय टेन मोटार (MH 03 AZ 0502) मधून एक व्यक्ती तेथे आला. यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी त्याला बनावट नोटाबाबत विचारपूस केली. त्याने ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये आणले आहेत काय असे विचारले व एक लाख रुपये घेतले व माझे सोबत चला मी बनावट पैशाचा गोडावून दाखवतो, असे सांगून तेथून कळंबोली एक्सप्रेस हायवे रोडने लोणावळा-तळेगाव-दाभाडे व तेथून पुन्हा जुना मुंबई-पुणे हायवे रोडने चाकण, शिक्रापूर रांजणगाव येथे आला असता त्याने मोटारीचा वेग वाढवला. रांजणगाव येथे गाडी न थांबल्याने पथकास त्याच्या विश्वासार्हतेबाबत शंका आल्याने आरोपीची मोटार ओव्हरटेक करून गाडी थांबून त्याला ताब्यात घेतले.

याबाबत सिकंदर परमेश्वर राम (वय 32, रा. रुम नंबर 183 एफ ओ डब्लू पी आंबेडकरनगर, अब्दुल गफार खान मार्ग वरळी, मुंबई) असे आरोपीने नाव सांगितले असून इतर साथीदार प्रशांत झुटानी, के. पी. सिंग (रा. सुरत, गुजरात) यांनी आपसात संगनमत केले. सिकंदर परमेश्वर राम याने बनावट चलनी नोटाचे गोडावून दाखवतो अशी पोलिस अधिका-यांना खोटी माहिती देऊन त्यासाठी एक लाख रुपये कळंबोली येथे स्विकारून बनावट नोटांचे गोडावून न दाखवता फसवणूक केली. या प्रकरणी सिकंदर परमेश्वर राम, कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के. पी. सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी सिकंदर परमेश्वर राम याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर येथे हजर केले होते. पोलिसांनी आरोपींना 15 दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, आरोपींचे वकिल किरण रासकर यांनी युक्तीवाद केल्याने न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, एस आय पवार पोलीस हवालदार मिरगे, शेख, जाधव, कोरवी, शेख, गावडे, चिंचकर, नलावडे, राक्षे, वाघमारे, काळे, मोरे, जगताप या पोलिस पथकाने दोन टीम करून खोटी माहिती देणारे गोपनीय बातमीदार सिकंदर राम यांना अटक केली आहे. याबाबत पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे करीत आहे.

Tags: 100 कोटीच्या बनावट नोटाAdvocate Kiran Raskaranti-terrorism squad assistant police inspector Arjun Mohitearrestatsconfidential informantCounterfeit notesfake Rs 100 crore notesKamlesh Jainnews reporter arrestOld Mumbai-Pune HighwaypolicePolice cheatedpolice fraudPolice Inspector Pravin KhanapurePrashant Jhutanipunepune rural ATSPune Rural Superintendent of Police Abhinav DeshmukhRs 100 crore counterfeit notesShikrapurSikander Parmeshwar RamUpper Superintendent of Police Milind Mohiteअटककमलेश जैनके. पी. सिंगकोठडीगोपनीय बातमीदारजुना मुंबई-पुणे हायवेदहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहितेपुणे ग्रामीण पोलीसपोलिसपोलिस निरीक्षक प्रविन खानापुरेपोलिसांची फसवणूकप्रशांत झुटानीबनावट नोटावकिल किरण रासकरशिक्रापुरसिकंदर परमेश्वर राम
Previous Post

SBI Account मध्ये सबसिडी हवीये ? तर ‘आधार’शी असे करा अकाउंट लिंक, जाणून घ्या प्रक्रिया

Next Post

Vastu Tips : कर्जाच्या ओझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 वास्तु उपाय, दूर होईल दारिद्रय

Next Post
note

Vastu Tips : कर्जाच्या ओझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' 5 वास्तु उपाय, दूर होईल दारिद्रय

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Rahuri News : पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं तरुणाची आत्महत्या !

3 days ago

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

3 days ago

Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ 17 राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढे कसे असेल हवामान

6 days ago

Palghar News : पालघरमध्ये Bird Flu चा शिरकाव ! शासकीय पोल्ट्री फार्ममधील 50 कोंबड्यांचा मृत्यू

3 days ago

ममता सरकारचा मोठा निर्णय ! पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल-डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

5 days ago

SBI च्या Yono मर्चंट App चा 2 कोटी वापरकर्त्यांना होणार फायदा, जाणून घ्या कसे करणार काम

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat