Pune News | टेम्पोसह विहिरीत पडलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका, कात्रज-कोंढवा रोडवरील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पिकअप टेम्पोसह विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीला पुणे अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी बाहेर काढून त्याची सुरखरुप सुटका केली. ही घटना बुधवारी (दि.22) सकाळी पावणे दहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील (Katraj-Kondhwa Road) पुरंदर वॉशिंग सेंटर जवळ घडली. टेम्पोसह एक व्यक्ती विहिरीत पडल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला (Fire brigade Control Room) मिळताच कात्रज अग्निशमन केंद्रातून एक वाहन तातडीने घटनास्थळी (Pune News) दाखल झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, अंदाजे 40 फुट खोल असलेल्या विहिरीमध्ये एक व्यक्ती पडली असून कडेला असणाऱ्या एका दोराला पकडून ती व्यक्ती उभी असून भेदरलेल्या स्थितीत आहे. जवानांनी तात्काळ मोठी रश्शी, रिंग पाण्यात टाकून जवान किरण पाटील यांना विहिरीत उतरवले. पाटील यांनी विहिरीत अडकलेल्या व्यक्तिशी संवाद साधत त्याला धीर दिला. तसेच त्याच्या कमरेला दोर बांधला व रिंगचा वापर करत या व्यक्तीला इतर जवानांनी सुखरुप बाहेर घेत सुखरुप सुटका केली. जवानांनी सुमारे तीस मिनिटात ही कामगिरी (Pune News) यशस्वीरित्या पुर्ण केली.
अधिक माहिती घेतली असता, पिकअप टेम्पो वॉशिंग सेंटर येथे आला असता वाहन चालक उतरून बाहेर
जाताच विनोद पवार (वय 35) यांने टेम्पोत बसून टेम्पोचा रिवर्स गियर टाकला आणि अचानक टेम्पोसह
पवार विहिरीत पडल्याची घटना घडली. या कामगिरीत कात्रज अग्निशमन केंद्र अधिकारी संजय रामटेके,
वाहनचालक बंडू गोगावले, तांडेल वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी सहभाग घेतला.
Web Title : Pune News | Person who fell into well with tempo rescued by fire brigade, incident on Katraj-Kondhwa road
हे देखील वाचा :
Pune Crime News | कारचालकांची मुजोरी; स्वत: दिली धडक, पीएमपी चालकाला मारहाण
Pune Crime News | सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; हडपसर पोलीस ठाण्यात FIR
Comments are closed.