बहुजननामा ऑनलाइन टीम – चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणावर सपासप वारकरत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर ( three attack young man)आली आहे. कोंढव्यातील काझी चौकात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अरबाज शेख, शहनवाज शेख (वय 22), सय्यदअली उर्फ कुरेशी उर्फ गुटऱ्या (रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मोहसीन गालिफ सय्यद (वय 28, मक्का मस्जिदजवळ, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी तीन महिन्यांपूर्वी आरोपी अरबाज शेख याच्या चुलतीला शिव्या दिल्या होत्या. याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान काल फिर्यादी हे थांबले असता त्याठिकाणी आरोपी अरबाज शेख व इतर साथीदार तेथे आले. त्यांनी पूर्वीच्या कारणावरून वाद काढत तरुणावर हल्ला केला. तसेच त्याला ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला. परंतु फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला कपडे काढुन बेदम मारहाण केली. अधिक तपास सहायक निरीक्षक मधाले करीत आहेत.