Pune News : पुण्यातील कुविख्यात गुन्हेगार जग्या उर्फ जगदीशचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून, मृतदेह डुक्कर खिंडीतील पुलाखाली आढळल्यानं प्रचंड खळबळ

wife
January 20, 2021

बहुजननामा ऑनलाइन टीम –  एका कूविख्यात गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह डुक्कर खिंड येथील पुलाखाली टाकला होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

जग्या उर्फ जगदीश पारध्ये (वय 28, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जग्या उर्फ जगदीश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आज दुपारी एक मृतदेह पुलाखाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कोणाची याची माहिती घेत असताना तो गुन्हेगार जग्या याचा असल्याचे समजले. त्यानुसार ओळख पटविण्यात आली. त्याचे नातेवाईकांनी त्याला ओळखल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सुरू आहे.