बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात भाजपसोबतची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे हे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, असा टोला लगावला होता. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगत निलेश राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
अजित पवार पुण्यात सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायचे का ? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात निलेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.
काय म्हणाले होते निलेश राणे ?
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले होते की, काय चाललंय महाराष्ट्रात ? मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी ? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगाव, असे राणे म्हणाले होते.
निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीत चाललयं काय ?? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता.
मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 14, 2021