पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज (शनिवारी) राज्यातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या (Central Government) महागाई विरोधात आंदोलन केलं आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅसच्या दरांत झालेल्या वाढीविरोधात आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, पुण्याच्या (Pune) राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलन दरम्यान मुरळी नाचवल्याने हे राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाची चर्चा होत आहे. तसेच, टीकेचा विषय देखील (Pune News) ठरला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पुण्याच्या स्वारगेट चौकातील आंदोलनात जागरण गोंधळ घातला गेला.
मात्र, या जागरणामध्ये मुरळी नाचवल्याने आंदोलनाच्या गोंधळावर टीका देखील होताना दिसत आहे.
महिलांना अशाप्रकारे आंदोलनामध्ये नाचवणे कितपत योग्य आहे? असे सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या गोंधळाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
आंदोलना दरम्यान, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, ‘देशात भाजपचे सरकार आल्यापासून प्रत्येक वस्तूच्या दरात दुपटीने वाढ झालीय.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 100 डॉलर असताना भारतात पेट्रोलची किंमत 70 रुपये होती.
आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 70 रुपये असताना आपल्याकडे पेट्रोलचे दर 100 रुपये असतात.
जे खाद्यतेल 80-90 रुपयांना मिळायचं ते खाद्यतेल आता 200 रुपयांना मिळत आहे.
जो स्वयंपाकाचा गॅस 400 रुपयांना मिळायचा तो आता 850 रुपयांना मिळतोय, असं चाकणकर म्हणाल्या.
पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘बहोत हुई महंगाई की मार’ अशा फुशारक्या मारत नरेंद्रजी मोदी सत्तेत आले.
मात्र, सत्तेच्या खुर्चीवर बसताच मोदींनी जनहित बाजूला ठेवून फक्त आपल्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम केल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे.
Web Title : Pune News | ncps agitation against inflation confusion muralis dance came fore pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना
Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’