पुणे : बहुजननामा ऑनलाईन – (Pune News) इंधन आणि घरगुती गॅसची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली असताना, पुण्याचे खासदार (Pune MP) त्याविरोधात चकार शब्द काढत नाहीत. सत्तेच्या लोभामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. जनतेचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (former mla mohan joshi) यांनी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पेट्रोल, डिझेल आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि कसबा ब्लॉक काँग्रेस यांच्यावतीने सोमवारी सायकल रॅली (Cycle Rally) काढण्यात आली. डुल्या मारुती चौकापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सोन्या मारुती चौक, मोती चौक, सात तोटी चौक, शिंपी आळी, काका वडके यांचे घर अशा मार्गाने रॅलीचा समारोप कसबा गणपती मंदिराजवळ खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या कार्यालयासमोर जाहीर सभेने करण्यात आला. Pune News | MP Girish Bapat forgot about the people; Criticism of former MLA Mohan Joshi
पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. गेले तीन महिने पेट्रोल, डिझेल यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने अन्य वस्तूंचीही दरवाढ झालेली आहे. साखर, खाद्यतेल, धान्य या सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून महागाईने कळस गाठला आहे. महागाईमुळे जनता हैराण झाली असताना महागाई विरोधात आवाज उठवण्याऐवजी पुण्याचे खासदार झोपलेले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी सभेत बोलताना सांगितले. संसदेचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात तरी पुण्याच्या खासदारांनी महागाईविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली.
या सभेत कमलताई व्यवहारे, वीरेंद्र किराड यांची भाषणे झाली. सुरेश कांबळे यांनी आभार मानले.
रॅलीमध्ये अॅड. अभय छाजेड, कसबा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण करपे, जयसिंग भोसले, बंडू शेडगे, बबलू कोळी, संदीप आटपाळकर, योगेश भोकरे, मयूर भोकरे, परवेझ तांबोळी, शैलेश भोकरे, अभिजित महामुनी, कुणाल जाधव,साहील राऊत, धनंजय माने, सोनवणे आदींनी भाग घेतला होता.
Web Title :- Pune News MP Girish Bapat forgot about the people Criticism of former MLA Mohan Joshi
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान