पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (lokshahir annabhau sathe) यांचा आज स्मृतिदिन होता. प्रथेनुसार पुण्यनगरीच्या महापौरांनी सकाळी सगळ्यात आधी येऊन अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर बाकीच्या संघटनांनी पुष्पहार अर्पण करण्याची दरवर्षीची प्रथा आहे. पण यंदा महापौर पुतळ्याच्या ठिकाणी कमालीच्या विलंबाने आले. त्यामुळे बाकीच्या संघटनांना तिथे सुमारे चार तास तिष्टत रहावे लागले. यामुळे उपस्थितांनी महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. झाल्या प्रकाराचा धिक्कार केला. महापौरांनी अक्षम्य विलंब करून एक प्रकारे स्व. अण्णा भाऊंचा अपमानच केला आहे. असा आरोप झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट (Bhagwanrao Vairat) यांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संघटनेच्या वतीने ही पुतळा स्थळी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. असे प्रकार व दिरंगाई यापुढे सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी संघटनेतर्फे महापौरांना देण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी दत्ता कांबळे, प्रदीप पवार, गणेश लांडगे, सुरेखा भालेराव, महंमद शेख, अर्चना वाघमारे, वंदना पवार, टिना शेखर, महादेव मोरे, सुर्यकांत संपकाळ, सोमनाथ सायरे, वैशाली अवघडे, नानासाहेब गोरे, संतोष सोनवणे, रमेश दोरगे, धिरज कांबळे, लक्ष्मण बिराजदार आदि उपस्थित होते. घटनास्थळी निर्माण झालेल्या तणावाची स्थिती भगवानराव वैराट (Bhagwanrao Vairat) यांनी संयमाने हाताळत कार्यकर्त्यांना शांत केले.
Web Titel :- pune news mayor murlidhar mohol breaks anna bhau sathe memorial practice slum security forces protest
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED ची धाड