पुणे (Pune News) :बहुजननामा ऑनलाइन- इंदापूर तालुक्यातील जंक्शन फॉरेस्ट(Junction Forest) परिसरातून एकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण (Kidnapped) करुन त्यानंतर त्याचा अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिसां(Indapur Police)नी नवनाथ हनुमंत राऊत आणि सोमनाथ भीमराव जळक(Navnath Hanumant Raut and Somnath Bhimrao Jhalak) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिवराज कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता़ इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. महिलेला पळवून नेल्याच्या घटनेतून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
हेगडे हे रविवारी सकाळी ६ वाजता घरी असताना दोघांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना जंक्शन फॉरेस्ट येथे आणले.
तेथे त्यांच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून आम्ही तुला खल्लास करतो, असे म्हणून पेटवून दिले व ते निघून गेले. या घटनेत शिवराज हेगडे भाजले असून इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
web title: Pune News | Kidnapped at gunpoint and tried to burn alive by throwing petrol
Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती
Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत