Pune News | पुणे जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्याच्या (Pune News) काही भागात मे महिन्याच्या अखेरीपासून पासून सुरु झाला होता. जूनच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत हा पाऊस सुरु होता. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप घेतली ती जुलैच्या मध्यापर्यंत हा पाऊस नव्हता त्या काळातच पुणे जिल्ह्यात (Pune News) 1 लाख 2 हजार 462 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या (kharif sowing) पूर्ण झाल्या आहेत. सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत पेरण्यांचे हे प्रमाण 55.60 टक्के एवढे आहे. सर्वाधिक पेरण्या भोर तालुक्यात (Bhor Taluka) 12 हजार 879 हेक्टरवर (Hectare) झाल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे जिल्ह्यात (Pune District) खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात. खरिपाचे सरासरी क्षेत्र हे 1 लाख 84 हजार 273 .78 हेक्टर इतके आहे. यापैकी 1 लाख 2 हजार 462 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) खरिपाचे सर्वाधिक 31 हजार 255 हेक्टर क्षेत्र असून, सर्वात कमी म्हणजे 3 हजार 137 हेक्टर क्षेत्र हे दौंड तालुक्यात (Daund Taluka) आहे.
दीड हजार कोटींचे कर्ज वाटप
खरीप हंगामातील पिकांसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (pune jilha madhyavarti sahakari bank) केले आहे. शून्य टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज वितरित करण्यात येत असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी सांगितले.
खरिपाचे सरासरी व पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी पूर्ण झालेले क्षेत्र
हवेली (haveli) 4911.18 1879.65
मुळशी (mulshi) 8771.86 1489.27
भोर (Bhor) 14,643 12,879
मावळ (Maval) 12,310 60,366
वेल्हे (Velhe) 5994.27 1688.58
जुन्नर (Junnar) 31,255.07 16,663
खेड (Khed) 23,619.90 15,358.65
आंबेगाव (Ambegaon) 18,528.80 5026.10
शिरूर (Shirur) 27,432.54 18380
बारामती (Baramati) 10,280.94 12,447
इंदापूर (Indapur) 7783.07 3044.40
दौंड (Daund) 3137.37 3218.30
पुरंदर (Purandar) 15,550.48 10,022.33
Web Title :- pune news kharif sowing area one lakh hectares pune district know taluka wise details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Comments are closed.