पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहरातील वारजे भागातील सारस अर्बन क्रेडिट सोसायटीकडून (Saras Urban Credit Society) दिले गेलेल्या कर्ज प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला (Warje Malwadi police Station) दिले आहेत. प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी हे आदेश दिले आहेत. सारस अर्बन क्रेडिट सोसायटी कार्यकारणी विरुद्ध सचिन फोलाणे (Sachin Folane) यांनी न्यायालयात तक्रार केली होती. तक्रारीवर न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी पोलिसांना तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
Pune News | Inquire into the loan case of the Saras Urban Society in Warje; Court directs police
नियम धाब्यावर बसवून कर्ज वाटप
फोलाणे यांच्या तक्रारीनुसार, सारस अर्बन क्रेडिटचे संचालक व अध्यक्ष गणेश धारप (Ganesh Dharap) यांच्या व्यवस्थापनाखाली सोसायटीने कोट्यवधी रुपयांची कर्ज दिली आहेत. मात्र कर्ज देत असताना कर्जदाराची योग्य पत, चाचणी तसेच मालमत्तेचे मूल्यांकन किंवा संबंधित व्यक्तीचे सीबील रेकॉर्ड याचे नियम धाब्यावर बसवून दिली गेली. तसेच कर्ज असणार्या मालमत्तांच्या सात बाराच्या उतार्यांवर कर्जाच्या नोंदी होऊ दिल्या नाहीत. ज्यामुळे या जमिनी परस्पर विकता येऊ शकतात. असे सर्व गैरप्रकार हाताळण्यासाठी गणेश धारपने वैकुंठ कुंभार नावाच्या कर्जदाराकडून 2 कोटी रुपयांची लाच (Bribe) घेतल्याचे फोलाणे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
संचालक मंडळाची मंजुरी न घेता मुदत ठेवीवर कर्ज
तसेच शेखर चरेगावकर नावाच्या खातेदारालाही धारप यांनी संचालक मंडळाच्या कोणत्याही पूर्व मान्यतेशिवाय व कोणत्याही तारणाशिवाय चारेगावकर यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले. याशिवाय संचालक मंडळाची मंजुरी न घेता संस्थेच्या मुदत ठेवीवर कर्ज काढून दिले व ओवरड्राफ्टची देखील सुविधा अशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्याचे समजते. शेखर चरेगावकर याचे नाव पुढे थकबाकीदारांच्या यादीत येऊन देखील चरेगावकर याच्या राजकीय वर्तुळातील ओळखी लक्षात घेऊन त्याच्यावर कोणतीही कारवाई सोसायटीने केली नसल्याचे समजतेय. सारस अर्बन क्रेडिट सोसायटीतील हा घोटाळा सचिन फोलाणे यांच्या वतीने त्यांची बाजू मांडणारे अॅड. ऋषीकेश चव्हाण यांच्या प्राथमिक अंदाजानुसार 11 कोटी रुपयांचा आहे.
सहकारी पतसंस्था तसेच सहकारी बँकामध्ये अशा स्वरूपाचे घोटाळे नित्याचे होत चालले असून या सहकारी संस्थांच्या मूळ संकल्पनेलाच धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात या पूर्वी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक व त्या पाठोपाठ शिवाजीराव भोसले सहकारी बँक तसेच अनेक बँक पतसंस्था मधील अशाच पद्धतीचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर आले आहेत. सारस क्रेडीट सोसायटीचा घोटाळा हा याच प्रकारचा अजून एक मोठा दखलपात्र गुन्हा संभवतो आहे.
Web Title : Pune News | Inquire into the loan case of the Saras Urban Society in Warje; Court directs police.
Uday Samant | ‘राणेंच्या मंत्रिपदाने शिवसेना आणखी त्वेषाने वाढेल’