पुणे (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन : दुचाकी चालकाचा पाठलागकरून डोळ्यात मिर्ची पूड टाकत लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे पुणे (Pune News) शहरात लूटमार करणाऱ्या गुन्हेगाराचे धाडस किती वाढले याची जाणीव होऊ लागली आहे.
याप्रकरणी अक्षय शिर्के (वय 25) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर (चोर) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा फूरसुंगी परिसरात राहतो. तो कामठे मळा येथून रात्री पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर दोघेजण आले व त्यांनी अक्षय याच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकली. घाबरलेल्या अक्षयने दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावरच पडला. डोळ्यात आग होत असल्याने तो बेचैन झाला होता. यावेळी या दोघांनी कोयता (scythe) दाखवत दाखवून त्याची दुचाहकी पळवून नेली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
सोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध ! हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण
Youth robbed in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले
Covid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा