पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्यात विश्रांतवाडी (Vishrantwadi, Pune) भागात राहणार्या 2 वर्ष दोन महिने वयाच्या कु. शिवांश चंद्रशेखर अडागळे याच्या बौद्धिक कौशल्य आणि चातुर्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (India Book Of Records) नोंद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याचा जन्म पुणे येथे दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी झाला. लहान वयात शाळेत जाण्यापूर्वीच शिवांशला 23 मराठी व इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत तसेच तो 1ते 30 पर्यंतचे इंग्रजी आकडे, संपूर्ण इंग्रजी वर्णमाला त्याच्या संबंधित शब्दा सहित म्हणून दाखवतो. तसेच बारा रंग, सदतीस प्राणी, चौदा फळे, बारा भाज्या, वीस अवयव, दहा आकार ओळखतो व बोलून दाखवतो. तसेच A-Z (इंग्रजी वर्णमाला ), 1-10 इंग्रजी अंक संगणकाच्या की-बोर्ड वर बिनचूक टाईप करतो. तसेच पंधरा प्राण्यांचे आवाज काढतो. हनोई टॉवर नऊ सेकंदात लावतो. 27 पेक्षा जास्त क्रिया (इंग्रजीमध्ये सांगितल्यास) करतो या व्यतिरिक्त तो आठवड्याचे दिवस म्हणून दाखवतो, वाहनांचे वेगवेगळे भाग ओळखतो.
अशा कर्तत्ववान मुलाचा यथोचित सन्मान आणि कौतुक आज विधानभवन,
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (deputy chief minister ajit pawar)
यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, शाल-श्रीफल, पुष्पगुच्छ आणि चाॅकलेट देऊन सन्मान करण्यात आला.
भविष्यात मोठमोठे यशाची शिखरे आणि विक्रम पादाक्रांत करावीत अशा शुभेच्छा दादांनी दिल्या.
याप्रसंगी आमदार सुनिल टिंगरे (mla sunil tingre),
प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख (NCP Youth Leader Pradeep Deshmukh),
विनोद पवार, विजय देसाई, श्रिनिवास मेखला, नचिकेत साळवी आणि अडागळे कुटुंब उपस्थित होते.
Web Title :- Pune News | Greetings from Ajit Pawar to Shivansh 2 years and 2 months old recorded in India Book of Records
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video