पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बहुजन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून ते सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवि कलम 153, 153(अ), 153(ब), 295(अ), 298, 500,501, 502, 505 (1) (क), 505(2),120(ब), 34 सह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांच्या तक्रारीनुसार जाणीवपूर्वक बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमविले. तसेच त्या ठिकाणी कोंढव्याबाबत वक्तव्य करून पुणेकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
असा निर्णय पालिकेने घेतला आहे, असे बेताल वक्तव्य केले. तर एका समाजाबाबतही केले असून, त्याचे चित्रीकरण करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. तसेच एक आक्षेपार्ह पत्र पुणे महापालिकेला दिले आहे. महापुरुषांच्या नावाची बदनामी केली असल्याचे काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.