पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक (Ex-Director of Intelligence Bureau ) विद्याधर गोविंद वैद्य (Vidyadhar Govind Vaidya) यांचे वृद्धापकाळामुळे आणि दीर्घ आजाराने (prolonged illness) पुण्यात (Pune News) निधन (Passed away) झाले. ते 85 वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा अविनाश वैद्य, तुषार वैद्य असा परिवार आहे. अविनाश वैद्य हे नागपूरमध्ये आहेत तर दुसरा मुलगा तुषार वैद्य हे शारजा मध्ये आहेत.
विद्याधर वैद्य यांचा जन्म 22 जानेवारी 1936 मध्ये बुरहानपूर (Born in Burhanpur) येथे झाले. त्यांचे शिक्षण पर्टवर्धन हायस्कूल आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर येथे झाले. विद्याधर वैद्य हे 1958 मध्ये भारतीय पोलीस सेवेत (Indian Police Service) रुजू होण्यापूर्वी विज्ञान संस्थेत गणिताचे व्यख्याता म्हणून त्यांनी काम पाहिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1994 मध्ये 36 वर्षाच्या उत्कृष्ट कार्याकाळानंतर ते इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक पदावरून निवृत्त झाले. वैद्य यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (President Police Medal) आणि भारतीय पोलीस पदक (Indian Police Medal) मिळाले आहे. तसेच देशातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. (Pune News)
Web Title : Pune News | Ex-Director of Intelligence Bureau passes away in Pune.