बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय जनता पार्टी पुणे शहर रोजगार आघाडी अध्यक्ष पदी संतोष अशोक परदेशी (वडगाव बुद्रुक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक ( Santosh Pardeshi )यांच्या शुभहस्ते संतोष परदेशी यांना नियुक्ती पत्र पदाच्या शहर कार्यालयात देण्यात आले.याप्रसंगी गणेश घोष, धीरज घाटे, नगरसेवक दिपक पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष परदेशी यांनी यापुर्वी भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहरचे चिटणीस व उपाध्यक्ष पदी यशस्वीपणे काम केलेले असून सध्या कौशल्य विकास व रोजगाराच्या क्षेत्रात ते भरीव कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांची रोजगार आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला असून मिळालेल्या पदाच्या योगे आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दृष्टीने रोजगार व उद्योग या क्षेत्रात गरजुना मोठ्या प्रमाणात सहकार्य व मदत करण्याचा मानस व्यक्त करून त्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबिवण्यात येतील असे म्हटले आहे.
‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून
मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...
Read more