Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उभारण्याचा विचार करावा – नितीन गडकरी

 Nitin Gadkari | toll pune satara road finally canceled nitin gadkaris big announcement.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  Pune News |  कात्रज चौकातील (Katraj Chowk) उड्डाणपुलामुळे वाहतुकीची मोठी समस्या सुटणार (Pune News) आहे. तसेच भविष्यातील लोकसंख्या व वाहतुकीचा ताण लक्षात घेता कात्रज – कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa Road) नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सहा पदरी डबल डेकर उड्डाणपुल उभारण्याचा विचार करावा. या रस्त्यासह राज्यातील महामार्ग आणि उड्डाणपुलांसाठी राज्य शासन आणि महापालिकेने भूसंपादन करून दिल्यास माझ्या विभागामार्फत उभारणीचे काम केले जाईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज येथे जाहीर केले.

नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने कात्रज चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. वंडर सिटी ते राजस सोसायटी (Wonder City to Rajas Society) दरम्यान होणाऱ्या सुमारे सव्वा की.मी. च्या पुलासाठी 169 कोटी रुपये खर्च येणार आहे. याचवेळी जिल्ह्यातील विविध 22 रस्त्यांवरील सुमारे 2 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. भूमिपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (dr. neelam gorhe), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), गिरीश बापट (MP Girish Bapat), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे (Mayor usha dhore), भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil), आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), चेतन तुपे (MLA Chetan Tupe), सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak), अशोक पवार (MLA Ashok Pawar), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole), दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite), माजी आमदार व भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर (Former MLA Yogesh Tilekar), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane), भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (pune city bjp president jagdish mulik), स्थानिक नगरसेवक रंजना टिळेकर (corporator ranjana tilekar), वृषाली कामठे (corporator Vrushali Kamthe), विरसेंन जगताप (Corporator Virsen Jagtap), राणी भोसले (Corporator Rani Bhosale), मनीषा कदम (Corporator Manisha Kadam), दत्तात्रय धनकवडे (Corporator dattatray dhankawade), प्रकाश कदम (Corporator Prakash Kadam), अमृता बाबर (Corporator amruta babar)आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, कात्रज चौकात अनेक अपघात होत होते. उड्डाणपुलामुळे यातून मार्ग निघाला याचे समाधान आहे. भविष्यातील गरज पाहता कात्रज कोंढवा रस्त्यावर डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याची गरज आहे. आता काम सुरू असतानाच याचा विचार करावा अशी माझी सूचना. पुणे जिल्ह्यात रिंगरोड तसेच शिक्रापूर, चाकण , तळेगाव असा पुणे मुंबई रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे नियोजन आहे. राज्यशासन आणि महापलिकेने भूसंपादन करून दिल्यास नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील रस्ते आणि उड्डाणपुलाची कामे करून देण्याची माझ्या खात्याची तयारी आहे. पालखी मार्गाचे काही ठिकाणचे काम भूसंपादनामुळे रखडले आहे. अजित पवार यांनी यातून मार्ग काढून द्यावा. तसेच येत्या काही दिवसात मुंबई चेन्नई तसेच दिल्ली मुंबई नवीन द्रुतगती मार्ग तसेच मुंबईतील काही महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ असेही गडकरी यांनी याप्रसंगी नमूद केले. तसेच सातारा रस्त्यावरील टोल सध्या बंद केला असून डिसेंबर पर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

अजित पवार म्हणाले, की गडकरी यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. त्यामुळेच सर्व पक्षाचे खासदार त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी जातात. राज्याचा विकास करण्यासाठी गडकरी यांचे कायम सहकार्य असते. भूसंपादनामुळे जमीन मालकांना त्रास होतो. पण वाहतूक कोंडीचा त्रास हा 90 टक्के जनतेला होत असतो. यातून बॅलन्स करत मार्ग काढावा लागतो. कोरोनामुळे राज्याला मागीलवर्षी आर्थिक आघाडीवर फटका बसला आहे. परंतु विकास प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही, हीच आमची भूमिका आहे.  राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देऊन कसे अधिकाधिक कामे करून घेता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहील. कात्रज– कोंढवा रस्ता परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या पाहता, या रस्त्यावर उड्डाणपुलाच्या माध्यमातून पर्यायी मार्ग करावा लागेल, असे मत यावेळी पवार व्यक्त केले.

आमदार चेतन तुपे यांनी कात्रज कोंढवा रस्त्याचे काम भूसंपादना अभावी रखडले आहे. प्रचलित दरानुसार भूसंपादनासाठी येणारा खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौक उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी जशी मदत केली तशीच मदत कात्रज – कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी करावी अशी मागणी याप्रसंगी केली. याप्रसंगी  डॉ. निलम गोऱ्हे , खासदार सुप्रिया सुळे यांचे समयोचित भाषण झाले.

कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे 30 वर्षापासूनचा वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटला. 2015 पासून या कामासाठी पाठपुरावा करत होतो. नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूलाचे काम शक्य झाले आहे. कात्रज कोंढवा रस्त्यासाठी नागरिक टीडीआर आणि एफएसआय च्या बदल्यात जागा देण्यास तयार होते. परंतु काही मंडळींनी जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला मागा असे भरीस घातल्याने रस्त्याचे काम रखडत गेले. राजीव गांधी उद्यानाच्या जागेतून उड्डाणपुलाचे काम करण्यास तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण मंत्रालयाचे नाहरकत पत्र मिळवुन दिले. खासदार गिरीश बापट यांनीही यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती हडपसर चे माजी अमादार योगेश टिळेकर (Former MLA Yogesh Tilekar) यांनी भाषणा दरम्यान दिली.

web title: Pune news consider building a double decker flyover on katraj kondhwa road nitin gadkari.

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखाली कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Ajit Pawar | ‘1 एकर जमिनीला 18 कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही’

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू