Pune News : बीएचआर प्रकरण : जळगाव येथे सील केलेले कार्यालय उघडा, न्यायालयाचे पुणे पोलिसांना आदेश
बहुजननामा ऑनलाइन टीम – आर्थिक घोटाळ्याप्रकरणात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे जळगाव येथील सील केलेले कार्यालय उघडण्याचे आदेश न्यायालयाने पुणे(Pune ) पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.
येथील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे(Pune ) पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथे 27 नोव्हेंबर रोजी छापे टाकले होते. यावेळी खानदेश मिल कॉम्प्लेक्समधील शॉप क्रमांक 42 आणि 43 येथील कार्यालयाची झडती घेऊन काही हार्डडिक्स जप्त केल्या होत्या. तसेच हे दोन कार्यालय सील केले होते. या प्रकरणी सात अर्जदारांच्या वतीने अँड रामेश्वर तोतला, राहुल तोतला यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून ही कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. गेल्या दीड महिन्यापासून ही कार्यालय बंद असून त्यामुळे नुकसान होत आहे. या कार्यालयांचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद ऍड तोतला यांनी न्यायालयात केला होता. तसेच, ही कार्यालय उघडताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. त्याबरोबरच या ठिकाणाहून जप्त केलेल्या हार्डडिस्क एक कॉपी अर्जदारांना द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना कार्यालयाचे सील उघडावे आणि जप्त केलेल्या हार्डडिक्सची एक प्रत अर्जदारांना द्यावी, असा आदेश दिल्याची माहिती ऍड तोतला यांनी दिली आहे.
Comments are closed.