पुणे / इस्लामपूर : बहुजननामा ऑनलाइन– Pune News | बंगळूरला नातेवाईकांकडे निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात (Islampur Accident) झाला. या अपघातात पुण्यातील (Pune News) अभियंता (Engineer) अनिकेत रामदास मूर्तरकर Aniket Ramdas Murtarkar (वय – 39 रा. वाकड – Wakad) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर पत्नी डॉ. ज्योती मूर्तरकर Dr. Jyoti Murtarkar (वय – 34) आणि मुलगा ईशान मूर्तरकर Ishaan Murtarkar (वय – 6) हे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. हा अपघात इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या (Islampur Police Station) हद्दीतील विठ्ठलवाडी – कामेरी Vitthalwadi – Kameri (ता. वाळवा) गावच्या हद्दीत रविवारी (दि.10) दुपारी तीनच्या सुमारास झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिकेत मूर्तरकर हे आपल्या पत्नी आणि मुलासह बंगळूरला (Bangalore) नातेवाईकांकडे निघाले होते.
राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) वाळवा तालुक्यातील (Valva Taluka) कामेरी गावच्या हद्दीत अनिकेत यांचा कारवरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली.
यामध्ये अनिकेत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत (Head Injury) होऊन त्यांचा मृत्यू झाला.
तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. (Pune News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हे पुण्यात अभियंता आहेत. तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे.
अनिकेत हे त्यांच्या कारने (एमएच 12 एफवाय 4624) पुण्याहून बंगळूरला आपल्या कुटुंबासह निघाले होते.
कामेरी गावच्या हद्दीत त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
यात अनिकेत यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर पत्नी ज्योती व मुलगा ईशान हे जखमी झाले असून त्यांना इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Web Title :- Pune News | An engineer from Pune wakad was killed and his wife and son were seriously injured in an accident near Kameri islampur
हे देखील वाचा :
Enforcement Directorate (ED) | काँग्रेसचा वरिष्ठ नेता ईडीच्या रडारवर; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
Weather Update | काही राज्यांना उन्हाचा चटका तर ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; IMD