बहुजननामा ऑनलाइन टीम – कात्रज नवीन बोगद्याजवळ एका उत्तर प्रदेशातील तरुणाचा खुन करून मृतदेह टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे.
अजित सिंह (वय 30) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कात्रज बोगद्याजवळ पुण्याकडे येत असताना एका मोकळ्या जागेत एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याचे दिसून आले. यानंतर ही माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना सांगितले. यावेळी पथकाने व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. त्याची माहिती घेत असताना पोलिसांनी कपडे तपासले असता खिश्यात आधार कार्ड मिळाले आहे. त्यात अजित सिंह नावाचे आधार कार्ड मिळाले आहे. त्यानुसार पोलिसांना अजित सिंह असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान त्याचा खून कोणी केला आणि का केला, हे मात्र अजून काहीच समजलेले नाही. अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.