बहुजननामा ऑनलाइन टीम – मित्राचे पिस्तुल ठेवून घेणे तरुणाला चांगलेच महागत पडले असून,(crime branch) त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 2 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
रमेश नरसिंग राठोड (वय 30, वडारवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. यादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट एकला माहिती मिळाली की अप्पर इंदिरानगर येथे एकजण पिस्तुल घेऊन फिरत आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 3 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हे पिस्तुल त्याचा दांडेकर पुलावर राहणारा मित्र रोहित उर्फ गोपाळ गवळी याने ठेवण्यास दिले असल्याचे तपासात सांगितले आहे. आता पोलीस त्याचा शोध घेत असून, त्यांनी हे पिस्तुल कुठून आणले आणि का याचा तपास करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी तुषार माळवदकर व सतीश भालेकर यांच्या पथकाने केली आहे.