पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (दि.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. अनावरण सोहळ्याला 24 तासही होत नाहीत तोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मेघडंबरीचा छोटा ‘कोपरा’ अपघाताने कोसळला. यानंतर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Pune NCP) शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने करण्यात आला आहे.
याबाबत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradip Deshmukh) म्हणाले की, ‘मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने (BJP) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले. परंतु श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) भाजपाचा शिवरायांबाबतचा आकस सातत्यानं दिसून आला असून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे.
परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला आहे.’ देशमुख पुढे म्हणाले की, भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे. केवळ निवडणुका (Elections) जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही असेही देशमुख म्हणाले.
Web Title :- Pune NCP | A small corner of the Meghadambari of Chhatrapati Shivaji Maharaj s memorial inaugurated by PM Modi accidentally collapsed agitation by Pune NCP
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update