पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident |पुण्यातील नवले ब्रिज परिसरात अपघातांची (Pune Navale Bridge Accident) मालिका सुरु असून काल (रविवार) तीन ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आज (सोमवार) अज्ञात वाहनाने जोरदार धडक (unknown vehicle hit) दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Accident) झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (PSI Nitin Jadhav), अमोल काळे (Amol Kale) व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती हा बेवारस तसेच वेडसर असल्याचे त्याच्या कपड्यावरुन दिसून येत आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Navale Bridge Accident)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. रुग्णवाहिका आल्यानंतर मृतदेह उचलण्यासाठी नागरिक येत नसल्याने पोलिसांनी स्वत: मृतदेह रुग्णवाहिकेत उचलून ठेवला. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title :- Pune Navale Bridge Accident | death pedestrian after being hit vehicle incident near navale bridge accident news.